आज इंटरनेटवर खगोलविषयक इतक्या वेबसाइट्स उपलब्ध आहेत की आपण घरबसल्या ज्ञानाचा महासागरात डोकावून पाहू शकतो या सर्व वेबसाइट्समध्ये अग्रेसर म्हणून 'हबल' (http://hubblesite.org/) या संकेतस्थळाचे नाव घ्यायला लागेल.जगातील सर्वोत्तम वेबसाइट्स मध्ये या वेबसाइटची गणना होते या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या काही ठळक सुविधा आपण आता पाहणार आहोत.
न्यूज सेंटर : यामध्ये आपण खगोलशास्त्रातील अतिशय ताज्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊ शकतो तसेच त्या आपण फेसबुक व ट्विटरवर शेअरसुद्धा करू शकतो व याचे वैशिष्ट म्हणजे आपण यावर १९९० पासूनची कोणतीही बातमी अतिशय सविस्तर वाचू शकतो व त्यांच्या न्यूजलेटर साठी मोफत सभासद होऊ शकतो.
गॅलरी : यामध्ये आपण हबल टेलीस्कोपने टिपलेल्या अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचा आनंद लुटू शकतो ही छायाचित्रे अतिशय दुर्मिळ तर आहेत तसेच ही छायाचित्रे बघताना खरेखुरे विश्व आपल्यापुढे येऊन राहते.ही सर्व चित्रे आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो.
चित्रांबरोबरच येथे विडिओदेखील डाउनलोड करण्याची सोय आहे हे सर्व विडिओदेखील अतिशय दुर्मिळ व खरेखुरे वाटणारे आहेत.
आभासी खगोल सहल हाही यातील एक अतिशय उत्कृत्ठ दुवा आहे यातून आपण तारे , ग्रह अनुभवू शकतो.
हबल डिस्कव्हरीज : यात हबल टेलीस्कोपने केलेल्या निरीक्षणातून काढलेले काही निष्कर्ष व कल्पना आहेत तसेच खगोलशास्त्रातील अतिशय किचकट अशा संकल्पना देखील येथे समजावून सांगितलेल्या आहेत व त्याबद्दलच्या योग्य त्या लिंकसुद्धा दिल्या आहेत.
एक्स्प्लोर अस्ट्रोनॉमी : हा मला आवडलेला सर्वोत्तम दुवा आहे यात आपण खगोलशास्त्राविषयी जगभर चालणाऱ्या टी.व्ही. कार्यक्रमांचे विडिओ पाहू शकतो तसेच एखाद्या टेलीस्कोपप्रमाणे संपूर्ण विश्वाची सहल करू शकतो त्याबरोबर वेगवेगळ्या दिवसांचे आकाश पाहू शकतो याचबरोबर काही सॉफ्टवेअरमध्ये हबलला अॅड करू शकतो.
एज्युकेशन अॅण्ड म्युझियम : हा विद्यार्थांसाठी सर्वोत्तम दुवा आहे.येथे अतिशय बेसिक संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत.
तसेच ही साईट कशी बघायची यासाठी पण वेगळा दुवा आहे.
अशी ही साईट प्रत्येक खगोलप्रेमीने आवर्जून बघावी व आपला प्रतिसाद कळवावा.